Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात;पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत प्रचार दौरा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. प्रचाराला जोरदार सुरूवात झाली असून सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात असणार आहेत.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत एकनाथ शिंदेंचा प्रचार दौरा असणार असून या रोडशोची सुरूवात वरळीतून होणार असून वरळीनंतर शिवडी आणि सायन कोळीवाडा येथे संपणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत निलेश राणेही असणार आहेत.
Summary
एकनाथ शिंदे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत प्रचार दौरा
वरळी शिवडी आणि सायनकोळीवाड्यात सभा
