Eknath Shinde : सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर प्रचार सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका, प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर प्रचार सभा होणार आहे.
सांगोला नगरपालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज दुपारी दोन वाजता सभा होणार असून शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.
सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शेतकरी कामगार पक्ष आणि इतर स्थानिक आघाड्यांनी एकत्र येऊन शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात पॅनल उभं केले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शहाजी बापू पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summery
सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा
शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारासाठी मैदानात
आज दुपारी दोन वाजता सभा आयोजित
