Election 2026
ELECTION 2026: BOGUS VOTER SCANDAL ROCKS VIRAR TO MALEGAON, MAHARASHTRA MUNICIPAL POLLS UPDATE

Election 2026 : मतदार यादीवर प्रश्नचिन्ह! विरार ते मालेगावमध्ये बोगस मतदारांचा कहर, समोर आलेल्या माहितीमुळे खळबळ

Maharashtra Elections: विरार ते मालेगावमध्ये बोगस मतदारांचा सुळसुळाट, मतदान केंद्रांवर वाद आणि दुबार मतदानाच्या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्रात आज १५ जानेवारीला २९ महापालिकांसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत बोगस आणि दुबार मतदानाच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरातील हजारो मतदान केंद्रांवर मतदार मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, तर निकाल उद्या १६ जानेवारीला जाहीर होणार आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या नेते आणि उमेदवारांकडून बोगस मतदान आणि दुबार मतदानाच्या तक्रारींनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विरारमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वांनाच आश्चर्य व्यक्त केले आहे. येथील मतदार महेश राठोड यांच्या नावावर दुसऱ्याने अगोदरच मतदान केल्याचा आरोप आहे. स्वतः महेश राठोड यांनी सांगितले, "मी मतदान करायला गेलो होतो. पण अधिकारी म्हणाले, तुमचे मतदान झालेले आहे. मी आताच आलो आहे, माझे मतदान कसे झाले, असा प्रश्न विचारला, तरीही त्यांनी मतदान झाल्याचे सांगितले." या घटनेमुळे स्थानिक उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली असून, चौकशीची मागणी केली आहे.

दुसरीकडे, मालेगावमधील मतदान केंद्र क्रमांक ९ वरही बोगस मतदानाचा गंभीर आरोप समोर आला आहे. एका उमेदवाराने काही मतदार बोगस असल्याचा आक्षेप घेतला, ज्यामुळे त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. आधार कार्डवर नाव नसलेल्या व्यक्तीने मतदान केल्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर बोगस मतदाराने पळ काढला आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेमुळे मतदान प्रक्रिया काही काळ खंडित झाली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com