Solapur : अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Solapur) मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाने मान्यता देण्यात आली आहे.
सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी हे विजयाचे प्रमाणपत्र सुपूर्द करणार असल्याची माहिती मिळत असून आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार सचिन मुळीक हे अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध
अनगर नगरपंचायत निवडणुकीची बिनविरोध घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता
निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृत घोषणा करणार
