Avadhoot Gupte : निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं; गायक अवधूत गुप्ते यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Avadhoot Gupte)मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने विशेष प्रचारगीत तयार करण्यात आले होते. मात्र, निवडणूक आयोगाकडून भाजपचं हे प्रचार गीत नाकारण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या गाण्यातील ‘भगवा’ या शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले हे गीत लोकप्रिय कलाकार अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे. याच पार्श्वभूमीवर आता गायक अवधूत गुप्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गायक अवधूत गुप्ते म्हणाले की, "भगवा या शब्दावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की. भगवा शब्द चालणार नाही. मला माहित नाही नक्की काय झालं? ते पत्र मला अजून मिळालेलं नाही आहे. मला नाही वाटतं फक्त भगवा या शब्दावरती काही आक्षेप असावा. माझ्यापर्यंत अजून काही आलेले नाही की तुम्ही दुरूस्ती करुन द्या." असे अवधूत गुप्ते म्हणाले.
Summary
निवडणूक आयोगानं भाजपचं प्रचार गीत नाकारलं
निवडणूक आयोगाच्या आक्षेपावर अवधूत गुप्ते यांची प्रतिक्रिया
'निवडणूक आयोगाचे पत्र अजून माझ्यापर्यंत आलेले नाही'
