Electric ST Bus
Electric ST Bus

Electric ST Bus : राज्यातील ग्रामीण, शहरी, निमशहरी भागातही इलेक्ट्रिक एसटी बस धावणार

राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी , इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळात विद्युत बस दाखल केल्या जाणार आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Electric ST Bus ) राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीमध्ये आधुनिकता आणण्यासाठी , इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळात विद्युत बस दाखल केल्या जाणार आहेत. ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लि. कंपनीद्वारे विद्युत बसचा पुरवठा करण्यास नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार पुढील 2 वर्षांत 5 हजार विद्युत एसटी बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागाला विद्युत एसटी बस एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी पण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

एसटी महामंडळाच्या अनेक आगारातील बस कालबाह्य आणि बिघडलेल्या स्वरूपात आहेत. या अशा बस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. अनेक वेळेला ह्या बस बंद पडतात किंवा त्यांच्यात काही तांत्रिक बिघाड होतो आणि त्यामुळे प्रवाशांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्यात नव्याकोऱ्या विद्युत बस खरेदी केल्या जाणार आहेत.

एसटी महामंडळाने 5,150 वातानुकूलित विद्युत बस घेण्याचा निर्णय याआधी घेतला होता. परंतु मार्च 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एसटीला नऊ मीटर लांबीच्या 138 व 12 मीटर लांबीच्या 82 अशा एकूण 220 बस पुरविण्यात आल्या. मात्र ज्या बसेसची मागणी केली होती त्या बस न दिल्याने या कंपनीचे करार रद्द केले जाणार होते . परंतु कंपनीने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

सुधारित पुरवठा वेळापत्रकानुसार आता 2025 वर्षाच्या अखेरीस टप्प्याटप्प्याने 620बस, 2026 वर्षात 2100 बस आणि 2027 पर्यंत उर्वरित बसचा पुरवठा केला जाईल. या सुधारित वेळापत्रकानुसार बसचा पुरवठा होण्यासाठी कोणताही विलंब होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाचे थेट लक्ष असणार आहे , अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिका-याने दिली. एसटी महामंडळाने विभागानुसार नवीन खाते सुरु केले असुन विद्युत बस मधून जितके उत्पन्न येईल त्या प्रमाणे कंपनीला बिलाची रक्कम देण्यात येणार आहे. आता त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता गारेगार प्रवास करता येणे शक्य होणार आहे. आणि बस इलेक्ट्रिक असल्यामुळे इंधनाचा खर्च ही कमी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com