महाराष्ट्र
Electricity Workers Strike : राज्याची बत्तीगुल होणार? वीज कामगार करणार राज्यव्यापी संप, कारण काय?
वीज क्षेत्राच्या खासगी करणाला विरोध आणि विविध मागण्यांसाठी वीज कामगारांनी 20 मे रोजी राज्यव्यापी संप पुकारला आहे.
वीज क्षेत्राच्या खासगी करणाला विरोध आणि विविध मागण्यांसाठी वीज कामगारांनी 20 मे रोजी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात राज्यातील सर्वच वीज कामगार संघटना सहभागी होणार आहेत.
वीज कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी म्हटल आहे.
समांतर वीजवितरण परवाना, 329 वीज उपकेंद्रांचे खासगीकरण अशा विविध बाबींना विरोध करण्यासह सर्व वीज कामगारांना पेन्शन लागू करावी, या मागण्यांसाठी वीज कामगार आक्रमक झाले आहेत.