महाराष्ट्र
Nanded OBC Morcha : नांदेडमध्ये आज ओबीसींचा एल्गार महामोर्चा; प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार होणार सहभागी
मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात मोर्चा
थोडक्यात
नांदेडमध्ये आज ओबीसींचा एल्गार महामोर्चा
प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार होणार सहभागी
मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात मोर्चा
(Nanded OBC Morcha) आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
2 सप्टेंबरचा ओबीसी विरोधी जीआर रद्द करा, 25 लाख बेकायदेशीर कुणबी नोंदी रद्द करा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा, प्रत्येक जिल्हात तालुकानिहाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या मोर्च्यात वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सहभागी होणार आहेत. हा मोर्चा नवीन मोंढा मैदान ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.
