Disciplinary notice : आता ईमेल, व्हॉट्सअॅपवर येणार शिस्तभंगाची नोटीस; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा नवा आदेश
(Disciplinary notice ) ईमेल, व्हॉट्सअॅपवर देखील आता शिस्तभंगाची नोटीस येणार असल्याची माहिती मिळत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅप, ईमेलवरही पाठविली जाणार आहे. शिस्तभंगाच्या नोटीसीला वेळेत उत्तर देता यावे आणि यासंदर्भातील कारवाईला गती देण्यासाठी आता ईमेल आणि व्हॉट्सअॅपवरही नोटीस पाठविली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यासंदर्भात राज्य शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे.वेळेत पत्रव्यवहार पोहोचत नसल्यामुळे शिस्तभंग कारवाईला उशीर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे हा बदल करण्यात आला असून सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
याच्याआधी दोषारोप पत्र किंवा चौकशी अहवाल अशी शिस्तभंगाशी संबंधित कागदपत्रे व्यक्तिशः किंवा टपालाने पाठवली जायची आता मात्र, अनेकदा ही कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईत आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नोटीस मिळाल्यावर कर्मचाऱ्यांना पोच देण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाने 3 जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी करून परिपत्रक प्रसिद्ध केले असून आता शासकीय कर्मचार्यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर ही कागदपत्रे पाठवली जाणार असून याशिवाय, व्हॉट्सअॅपद्वारेही नोटिसा पाठवण्याची सोय करण्यात आली आहे.