महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उगारला बडगा

महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उगारला बडगा

Published by :
Jitendra Zavar

महावितरण कंपनीमधील (MSEB) भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज विधानसभेत कठोर भुमिका घेतली. राऊत यांनी एका अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करत निलंबित केले. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार (Sumit Kumar) यांना राऊत यांना निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले केलं की, भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसंच राऊत यांनी यांनी अधिकाऱ्यांनाही कठोर संदेश दिले आहेत.
काय होते आरोप
निलंबित केलेल्या सुमित कुमार यांच्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. महावितरणमधील मीटर रीडिंग एजन्सी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या पैशांची मागणी करणे, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना धमकावणं असे आरोप संबंधीत अधिकाऱ्यावर आहेत. दरम्यान, या धमकीची रेकॉर्डिंग क्लिप देखील उपलब्ध आहे. मात्र, क्लिप उपलब्ध असूनही ठोस कारवाई होत नव्हती. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत करून मुख्य तपास अधिकारी पद मिळवण्याचं काम हा अधिकारी करत होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com