Nagpur
महाराष्ट्र
Nagpur : नागपूरच्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यात स्फोट
नागपूरच्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोजिव्ह कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे.
( Nagpur) नागपूरच्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोजिव्ह कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 15 हून अधिक कामगार जखमी झाले असून यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर काही कामगार आयसीयूमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.
रात्री बारा वाजता हा स्फोट झाला असून यावेळी रात्रपाळीत काम करणारे 30 ते 40 कर्मचारी विविध युनिटमध्ये काम करत होते. जखमींना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोलर एक्सप्लोजिव्ह ही खाजगी क्षेत्रातील स्फोट निर्माण करणारी कंपनी आहे.
याच्याआधी 17 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी भीषण स्फोट झाला होता. त्यात 9 कामगाराचा मृत्यू झाला होता.