एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट, महिला वाहक जखमी

एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट, महिला वाहक जखमी

Published by :

एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे. या दुर्घटनेत महिला वाहक जखमी झाली आहे. प्रवाश्यांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करत असताना तिकीट मशिनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक गंभीर जखमी झाली. ही घटना गोंदियाच्या मुख्य बसस्थानक परिसरात घडली.

कल्पना मेश्राम असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात या महिला वाहकाने तक्रार दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com