Chandrashekhar Bawankule : पीक पाहणी नोंदणीला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
थोडक्यात
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय
(Chandrashekhar Bawankule) राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय दिला आहे. 29 ऑक्टोबर रोजी पीक पाहणी नोंदणीची मुदत संपली होती.
त्यानंतर आता या पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूरसदृश्य परिस्थिती, अवकाळी पाऊस, दुपार पेरणी कारणाने पीक पाहणी नोंदणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून पीक पाहणी नोंदणी न झाल्यास नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज, पीक विमा लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खरीप हंगाम पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
