मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याची बतावणी करत नाशिक बँकेच्या प्रशासकांना तोतया फोन

मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याची बतावणी करत नाशिक बँकेच्या प्रशासकांना तोतया फोन

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशी सुरू असलेल्या एका अधिकाऱ्याला कामावर रुजू करून घेण्यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याची बतावणी करून तोतया फोन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशी सुरू असलेल्या एका अधिकाऱ्याला कामावर रुजू करून घेण्यासाठी चक्क मुख्यमंत्र्यांचा पीए बोलत असल्याची बतावणी करून तोतया फोन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतापसिंह चव्हाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात याबद्दल फिर्याद दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा पीए असल्याची बतावणी करत नाशिक बँकेच्या प्रशासकांना तोतया फोन
टेस्ला उभारणार गुजरातमध्ये प्रकल्प; नवीन वर्षात होणार घोषणा

माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेत शैलेंद्र पिंगळे हे अधिकारी म्हणून काम करतात. त्यांची काही महिन्यांपासून बँकेकडून अंतर्गत चौकशी सुरू आहे. याबाबत त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून मी मुख्यमंत्री साहेबांचा पीए बोलतोय आणि चव्हाण यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्या, असं सांगण्यात आले. याबाबत या पीएची चव्हाण यांनी चौकशी केली असता मुख्यमंत्री कार्यालयात असा कुठलाही पीए काम करत नसल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी प्रतापसिंह चव्हाण भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या तोतया पीएचा पोलीस शोध घेत आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com