Nitin Upasani Arrested : बनावट शालार्थ आयडी घोटाळा, निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitin Upasani Arrested ) काही महिन्यांपासून बनावट शालार्थ आयडी प्रकरणात अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात अनेक अधिकारी आणि शिक्षण संस्था चालकांना अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक करण्यात आली असून बनावट शालार्थ आयडी प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली असून यापूर्वी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे उपासनी यांच्या सहभागाचे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. बनावट आयडी प्रकरणी आतापर्यंत 9 जण ताब्यात घेण्यात आले आहेत.
पुणे एसआयटीच्यावतीने या प्रकरणाचा तपास सुरू असून उपासनी यांची मनपातील कारकीर्द देखील वादग्रस्त ठरली होती.
Summery
निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना अटक
बनावट शालार्थ आयडी प्रकरणी अटक
आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
