सूर्याभोवतीच्या खळ्याचे सिंधुदुर्गात दर्शन; शास्त्रीय कारण काय ?
समीर महाडेश्वर । सूर्याभोवती खळे पडणे या घटनेला खगोलशास्त्रात वेगळे महत्व आहे. सूर्याभोवती असणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. मंगळवारी सूर्याभोवती पडलेल्या खळ्याचे दर्शन सिंधुदुर्गवासियांनी अनुभवले.
आज सिंधुदुर्गात सूर्याभोवती इंद्रधनुष्य स्वरूपी रिंगण पाहायला मिळाले.दरम्यान सूर्याभोवती पडलेल्या या "खळं" ला इंग्रजीमध्ये "हॅलो" असे संबोधतात,तर मराठीत त्याला "इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ" म्हणतात,अशी माहिती कोल्हापूर विवेकानंद महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान व खगोल शास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मिलिंद कारंजकर यांनी दिली. सूर्या भोवती पडलेल्या या खळंचे शास्त्रीय कारण असे आहे की,वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ-जवळ २० हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात.या ढगांच्या मध्ये लाखों च्या संख्यने लहान लहान बर्फाचे "क्रिस्टल्स" असतात.
या क्रिस्टल्स मधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन,रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते.यामध्ये बर्फाचे असनारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात.पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १.३३ एवढा आहे.पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो.त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते.यातूनच सूर्याभोवती खळं पाहायला मिळते.या गोलाची त्रिज्या २२ अंश डिग्री इतकी असते.यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो.हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते,असे नाही तर काहीवेळा चंद्राभोवती सुद्धा पाहायला मिळते.