Kalyan : धक्कादायक! अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप
कल्याण : पुण्याला राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अडीच ते तीन महिन्यांपूर्वी नेहा जाधव या महिलेने कल्याण नजीकच्या गाळेगांव येथे आणून आपला भाऊ रोहन म्हस्के याच्याशी लग्न लावून दिले. यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून या मुलीने आपल्या वडिलांना फोन करत आपल्याला येथून घेऊन जाण्याची मागणी केली. मात्र वडील पुण्याहून कल्याणला येईपर्यंत या मुलीला तिच्या सासरच्या लोकांनी मारल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
या संतप्त प्रकारानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दिपक निकाळजे गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते आणि शालिनी वाघ यांनी कार्यकर्त्यांसह रुक्मिणीबाई रुग्णालयात जात मुलीच्या वडिलांना आधार दिला. तसेच अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर देखील उर्मट उत्तरं देणाऱ्या तिच्या नवऱ्याला काळे फासत चोप दिला. तसेच या मुलाला आणि त्याच्या बहिणीला अटक करत कारवाई करण्याची मागणी केली.