प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता प्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. बहुजन समाजवादी पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.

मुंबई उत्तर पूर्वमधून उमेदवारी अर्ज नंदेश उमप यांनी दाखल केला आहे. नंदेश उमप यांच्या अर्जामुळे आता मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात आता चौरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com