औरंगाबादमधील फेमस युट्युबर बिनधास्त काव्या बेपत्ता

औरंगाबादमधील फेमस युट्युबर बिनधास्त काव्या बेपत्ता

पोलीस सहकार्य करत नसल्याची पालकांची तक्रार
Published on

औरंगाबाद : प्रसिध्द युट्युबर 16 वर्षीय बिनधास्त काव्या बेपत्ता झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी छावणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांकडून मुलीचा शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु, पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.

बिनधास्त काव्या शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी कुटुबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी अभ्यासाच्या कारणावरून काव्याचे आणि तिच्या आई-वडिलांचे भांडण झाले होते. आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यानुसार काव्या ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रसिध्द युट्युबर बिनधास्त काव्याने कमी वयात युट्युबवर यशस्वी भरारी घेतली आहे. तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्राबर आहेत. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिध्द केला आहे. ती कधीही एकटी राहत नाही. कुठेही दिसल्यास आम्हाला कळवा, असे आवाहन त्यांनी व्हिडीओद्वारे केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com