PM Kisan Yojana : महत्वाची बातमी! 'ही' प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळणार नाही
(PM Kisan Yojana ) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात, जे तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येक चार महिन्यांनी 2,000 रुपये असे थेट बँक खात्यात जमा होतात. मात्र आता हा 20वा हप्ता मिळण्यासाठी या योजनेत महत्वाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
यंदाचा हप्ता हा जून महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या आधी ही प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे तसे नाही केल्यास शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
या प्रक्रियेमध्ये पहिली ‘KYC’ अनिवार्य करण्यात आली असून ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे तसे न केल्यास हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतरच शेतकऱ्यांचे खाते तपासले जाईल आणि त्यानंतर सर्व पूर्ण असेल तर पुढील हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती मिळत आहे. यासोबत शेतकऱ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी दोन्ही पद्धतीने करता येते.