सततच्या नापीकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
उदय चक्रधर, गोंदिया
सततच्या नापीकीला कंटाळून गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातिल रूगाटोला येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जयचंद विश्वनाथ पंधरे, वय 44 वर्ष असे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी जयचंद अनेक दिवसा पासून सतत चे नापीक, तसेत वाढणारे कर्ज यांच्या चिंतेत होते. शेतात मोठ्या आशेने धानपीक लावले खरे, मात्र त्यात पावसाचा मार आणि एका रोगाने पीक नासण्याच्या स्थितित आले. आता कर्ज फेडायचे कसे ह्या चिंतेत असतांना अखेर त्यांनी आपल्या शेतातच झाड़ाला गळफांस घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सालेकसा पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा दाखल केला.
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचा पश्चात पत्नी, एक मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. कमावता व्यक्ती गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट निर्माण झाले आहे. या करिता शासनाने मदत करावी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

