शेतकरी महिलेचा प्रामाणिकपणा; पन्नास हजार रुपये केले परत

शेतकरी महिलेचा प्रामाणिकपणा; पन्नास हजार रुपये केले परत

Published by :
Published on

संजय राठोड । यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेच्या खात्यात आलेलं पन्नास हजार रुपये तिने परत केल्याची घटना घडली आहे. विमलाबाई राठोड असे त्या महिलेचे नाव असून तिच्या या प्रामाणिकपणाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना पैशाची चणचण भासत आहे. एक एक पैसा जमा करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आर्णी तालुक्यातील शारी गावातील एका शेतकरी महिलेने चक्क तिच्या खात्यात आलेले पन्नास हजार रुपये परत करून प्रामाणिकपनाचा परिचय दिला. विमल राठोड असे महिलेचे नाव आहे. अमोल देशमुख याने फोन पे द्वारे मित्राला 50 हजार रुपये पाठवले होते. ते त्याला मिळाले नाही. त्यामुळे अमोल याने बँकेत जाऊन विचारणा केली असता, सदर रक्कम महिलेच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळाली. विमल राठोड या महिलेने प्रामाणिकपणा दाखवत पैसे परत केले. या प्रमाणिकपणाबद्दल महिलेचे कौतुक केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com