Dhule : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी केली कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी

Dhule : राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी केली कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत, जगावं की मरावं असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
Published by  :
Team Lokshahi

उमाकांत अहिराव | धुळे: राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. परंतु, धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका, साक्री, शिंदखेडा, दोंडाईचा, निजामपूर, कासारे, छाईल, यावर्षी जून अखेरीस तुरळक पाऊस झाला. याच तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. परंतु, ऑगस्ट महिना आला तरी अद्यापही मुसळधार पाऊस पडलेला नाही.

ऑगस्ट महिना उजाडला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस न पडल्याने पीक अक्षरशः कोमेजली आहेत. लाखोंचा खर्च वाया जातो की काय, अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावतांना दिसून येत आहे. आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आमच्याकडे कारण लाखोंचा खर्च करून खत बियाणे घेतली. परंतु पाऊस नसल्याने कर्ज फेडू कसं? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

राज्य सरकारने तात्काळ कृत्रिम पाऊस पडण्याच्या उपाययोजना कराव्यात, अशी देखील मागणी धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे. कमरे एवढं झालेलं पीक डोळ्यासमोर हातातून जाताना दिसून येत असल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com