Solapur Farmers
महाराष्ट्र
Solapur Farmers : शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत; सोलापुरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही
शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा नाही
थोडक्यात
सोलापुरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही
दिवाळी झाली तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीचे पैसे जमा नाही
(Solapur Farmers) मुसळधार झालेल्या पावसामुळे सोलापूरातील शेतकऱ्यांचे महापूरामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत दिली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही मदत करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.
सोलापुरातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसून शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. दिवाळी झाली तरी अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दिवाळीत नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती.मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न आल्याने शेतकऱ्यांकडून आता अनेक सवाल उपस्थित केलं जात आहेत.
