Dhule : अतिवृष्टीने शेतकरी संकटात; धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र डागडुजीचे आदेश
थोडक्यात
अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतकऱ्यांचं दिवाळं
तर दुसरीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डागडुजीचे कार्यादेश
जवळपास दीड कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयावर खर्च करण्याचा निर्णय चर्चेत
(Dhule) राज्यात मुसळधार पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं एकीकडे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालेले असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डागडुजीचे कार्यादेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
सरकार शेतकर्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असताना प्रशासनातील सरकारी विभागातून एक दिवसाचा पगार हा अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकर्यांसाठी देण्यात आला.
तर दुसरीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे डागडुजीचे आदेश काढून जवळपास दीड कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयावर खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे हा खर्च आता महत्त्वाचा आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
