Farmer Protest: 20 नोव्हेंबरला धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात एल्गार महामोर्चा

Farmer Protest: 20 नोव्हेंबरला धडकणार शेतकऱ्यांचे वादळ! रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात एल्गार महामोर्चा

आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे.
Published by :
shweta walge

आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, तरुणांची फौज एकवटली आहे. शेतकऱ्यांचे हे वादळ , 20 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात धडकणार आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात भव्य ‘एल्गार महामोर्चा’ जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे.

सोयाबीन कापूस - उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. या लढ्याचा पहिला टप्पा म्हणजे ‘एल्गार महामोर्चा’ आहे. या महामोर्चाची गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी रथ यात्रा सुरू झाली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासह शेतकरी, शेतमजूर, तरुणांची मोठी फौज उभी करत रविकांत तुपकर यांनी गाव खेडे पिंजून काढले आहेत. बुलढाणा शहरातील जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथून दुपारी १२ वाजता या महामोर्चाची सुरुवात होणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल त्यानंतर तेथे या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन रविकांत तुपकरांची तॊफ धडाडणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com