महाराष्ट्र
Dhananjay Munde | राज्यातील शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी सन्मान' योजनेतून मिळणार लाभ
केंद्रातील पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही नमो शेतकरी सन्मान योजना लागू होणार आहे.
मुंबई: केंद्रातील पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही नमो शेतकरी सन्मान योजना लागू होणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्राप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाचे मिळून एकूण बारा हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे, असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले आहे.