महाराष्ट्र
FASTag : फास्टॅग नसल्यास आता वाहन काळ्या यादीत
(FASTag) फास्टॅग नसलेल्या वाहनांना आता चाप बसणार आहे.
(FASTag) फास्टॅग नसलेल्या वाहनांना आता चाप बसणार आहे. वाहनचालक अनेकदा वाहनांच्या समोरील काचेवर फास्टॅग लावत नाहीत. यामुळे पथकर वसुलीत अडचण निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर ‘एनएचएआय’ने उपाययोजना केली आहे.
त्यामुळे आता फास्टॅग चिकटवले नसलेल्या वाहनांची तात्काळ तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ज्या वाहनांना फास्टॅग चिकटवले नसतील अशी वाहने तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. असे ‘एनएचएआय’ने निवेदनात म्हटले आहे.