Accident
महाराष्ट्र
Accident : पुणे-सातारा महामार्गावर खड्ड्यामुळे भीषण अपघात
एकामागोमाग एक 3 कार एकमेकांना धडकून अपघात
थोडक्यात
पुणे-सातारा महामार्गावर खड्ड्यामुळे भीषण अपघात
एकामागोमाग एक 3 कार एकमेकांना धडकून अपघात
कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान
(Accident) पुणे सातारा महामार्गावर खड्ड्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकामागोमाग एक अशा 3 कार एकमेकांना धडकून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
रस्त्यावर खड्डा समोर आल्याने कारने अचानक ब्रेक दाबला आणि एकामागोमाग एक 3 कार एकमेकांवर आदळल्या. या घटनेनंतर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काहीकाळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या,
सुदैवाने यात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, कारचं मात्र यात मोठ्या नुकसान झालं आहे. पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर, चेलाडी जवळच्या उड्डाणंपुलादरम्यान ही घटना घडली.