Buldhana
महाराष्ट्र
Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी
अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने अपघात
थोडक्यात
बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूरजवळ भीषण अपघात
पघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी
रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने अपघात
(Buldhana) बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमींना उपचारासाठी आधी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर त्यानंतर त्यांना जळगाव येथे पाठवण्यात आले. रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या त्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. जागीच ठार झालेल्यांमध्ये तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात सकाळी तीनच्या दरम्यान घडला असून पुढील तपास मलकापूर MIDC पोलीस करत आहेत.