Accident : अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Accident) अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात स्विफ्ट डिझायर आणि स्कार्पिओ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भरधाव वेगात असलेल्या या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि यामुळे कार थेट रस्त्याच्या दुभाजकावरून उसळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कार्पिओ गाडीवर जोरात आदळली.
गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस या अपघाताचा तपास करत असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Summery
अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भीषण अपघात
अपघातात 3 जणांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी
सायगाव उरुसाकडे जाणाऱ्या कारचा अपघात
