Accident
महाराष्ट्र
Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
(Accident ) नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका इको कारला सिमेंट कंटेनर चालकाने जोरदार धडक देत फरफटत नेल्याने हा भीषण अपघात झाला आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त मठात जाऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेले असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून नाशिक मुंबई महामार्गाच्या मुंढेगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात झाल्यानंतर घटनास्थळी घोटी पोलीस, महामार्ग पोलीस दाखल झालेत.
या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सर्व रहिवासी हे अंधेरी येथील असल्याची माहिती मिळत आहे.