Accident
Accident

Accident : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; 7 जण जखमी

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Accident ) पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात 7 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावाच्या हद्दीत नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने पाच वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची तीन दुचाकी, एक पिकप टेम्पो आणि एका ट्रकला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर आणि पिकअप टेम्पो पलटी झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांकडून क्रेनच्या साह्याने सर्व वाहनं महामार्गावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com