Accident
Accident

Accident : समृद्धी महामार्गावर ट्रक-बसचा भीषण अपघात; बस चालकाचा मृत्यू, 21 प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Accident) समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला असून 21 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर लासूर स्टेशनजवळ शुक्रवारी पहाटे ३ वाजता मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा हा अपघात झाला.

ओव्हरटेक करताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी बस ट्रकवर आदळली आणि बसने पेट घेतला. या आगीत बस चालकाचा मृत्यू झाला असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचा पोलिसांकडून आता तपास सुरू केला आहे.

Summary

  • समृद्धी महामार्गावर ट्रक-बसचा भीषण अपघात

  • छत्रपती संभाजीनगर येथील लासूर स्टेशनजवळ अपघात

  • पहाटे 3 वाजता मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या बसचा अपघात

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com