Malad : मुंबईतील मालाडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने मालाड पश्चिम येथील एका गोदामावर कारवाई करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर औषधसाठा जप्त केला आहे.
Published by :
Team Lokshahi

(Malad ) अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने मालाड पश्चिम येथील एका गोदामावर कारवाई करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर औषधसाठा जप्त केला आहे. 31 जुलै रोजी प्राणदा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या गोदामावर टाकलेल्या या धडक कारवाईत तब्बल 317 बॉक्समधील परवाना नसलेली आणि कालबाह्य औषधे जप्त करण्यात आली आहेत.या औषधांची एकूण किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

या छापेमारीत केसांच्या तेलासह विविध आजारांवरील कालबाह्य औषधे आढळून आली असून यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.अन्न व औषध प्रशासनाने ही धडक कारवाई केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com