मुंबईत गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओला भीषण आग

मुंबईत गोरेगावमध्ये फिल्म स्टुडिओला भीषण आग

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क
गोरेगावच्या बांगूरमध्ये 'आदिपुरुष' चित्रपटाचे शुटिंग चालू असताना सेटला आग लागली. शुटिंगदरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी काही लोक अडकले असण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.अग्निशमनच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी गेल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

गोरेगाव परिसरातील हायपर मॉलच्या मागे एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेट उभारण्यात आला होता. दुपारी काम सुरू असताना अचानक स्टुडिओला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com