NCP
NCP

NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय; उद्या शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंमध्ये बैठक

महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(NCP) महापालिका निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती.अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये काही नियोजित बैठकांसाठी उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटल्याची माहिती मिळत असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे मनपासाठी निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढविण्याबाबत उद्या बारामतीत अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांची बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट एकीकडे अजित पवार यांच्याशी बोलणी करत दुसरीकडे महाविकास आघाडी सोबत बोलणी करत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावर उद्या बारामतीत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summery

  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत उद्या अंतिम निर्णय

  • पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या तयारीत

  • उद्या शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंमध्ये बैठक

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com