Shivsena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत उद्यापासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी
थोडक्यात
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा?
सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय
(Shiv Sena Symbol) शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज अंतिम सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेचं नाव आणि धुनष्यबाणाचं चिन्ह कोणाच्या हातात जाणार? याबाबत उद्यापासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी पार पडणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालय बुधवारपासून अंतिम सुनावणी घेणार असून शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे.
यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ अंतिम युक्तीवाद ऐकून घेणार असून या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत काय निर्णय दिला जातो. हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
