सोनू सूदच्या बेकायदा बांधकामाप्रकरणी न्यायालयात अंतिम फैसला
लोकशाही न्यूज नेटवर्क
बेकायदा बांधकाम प्रकरणावरून मुंबई महापालिका आणि अभिनेता सोनू सूदमध्ये सुरु असलेल्या वाकयुद्धाचा फैसला आज न्यायालयात होणार आहे.मुंबई उच्च न्यायालय आज आपला निर्णय सुनावणार आहे.
निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर करून सोनूला त्यातून नफा कमवायचा आहे. त्यामुळेच बेकायदा बांधकामावर दोनवेळा कारवाई केल्यावरही त्याने ते पुन्हा बांधले. तिथे विनापरवाना हॉटेलही सुरू केले. बेकायदा बांधकामाबाबतची त्याची वृत्ती सराईत गुन्हेगारासारखीच आहे, असा दावा पालिकेने उच्च न्यायालयात केला होता. तसेच सोनूला कारवाईपासून कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणीही केली.
पालिकेच्या कारवाईविरोधात सोनूने उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम केलेले नाही, असा दावा त्याने केला आहे. तसेच पालिकेने कारवाईबाबत बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालय आपला निर्णय सुनावणार आहे.त्यामुळे या निर्णयात सोनू सुद दिलासा मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

