Election Commission : 'मतदारांची दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान रोखा', राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश
थोडक्यात
'मतदारांची दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान रोखा'
राज्य निवडणुक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश
प्रत्येक बुथवर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश
(Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
यातच आता 'संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा' असा राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांबाबत आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता 'मतदारांची दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान रोखा' असे राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
प्रत्येक बुथवर विशेष मोहीम राबवविणार, घरोघरी जाऊन कुठे मतदान करणार याची विचारणा करण्याचे निर्देश, बूथ पातळीवरील अधिकारी डू आर मतदारांच्या घरी जातील तसेच मतदार एकाच ठिकाणी मतदान करतील असे त्यांच्याकडून लिहून घेतले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
