Rohit Pawar
महाराष्ट्र
Rohit Pawar : सायबर पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?
माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
थोडक्यात
आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल गुन्हा दाखल
माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(Rohit Pawar) आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड बनवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दक्षिण प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपच्या सोशल मीडिया समन्वयकाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
