मृतांचे नातेवाईक २४ तासांपासून रुग्णालयाबाहेर…

मृतांचे नातेवाईक २४ तासांपासून रुग्णालयाबाहेर…

Published by :
Published on

पुण्यातील उरवडे या ठिकाणी रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा दुदैवी मृत्यू झाला. याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेला 24 तास उलटूनही मृतांच्या नातेवाईकांना उद्याप मृतदेह देण्यात आले नाहीत. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर मृतांच्या नातेवाईकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

आगीत मृत पावलेल्या कामगारांचे नातेवाईक मध्यरात्रीपासून ससून रुग्णालयात थांबून आहेत. पण रुग्णालयाकडून अद्याप त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नसल्याचं या नातेवाईकांनी म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com