Ulhasnagar
महाराष्ट्र
Ulhasnagar : उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार
उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ulhasnagar) उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 4 ते 5 जणांच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सचिन करोतीया याच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दोन राउंड फायर करण्यात आले.
या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी मोहित हिंदुजा आणि त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान पोलीस या सगळ्यांचा शोध घेत आहेत.
Summery
उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार
4 ते 5 जणांच्या टोळीकडून गोळीबार
गोळीबार प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल
