Fishing Boats : समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या 2 बोटी भरकटल्या
थोडक्यात
समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या 2 बोटी भरकटल्या
वादळात 6 पैकी 2 बोटी भरकटल्याची माहिती
32 खलाशी हरवल्याची माहिती
(Fishing Boats) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळाची परिस्थिती निर्माण झाली असून मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच इशारा देण्यात आल्यानंतर देखील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या 2 बोटी भरकटल्या असल्याची माहिती मिळत आहे.
अरबी समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या सहा बोटींपैकी दोन बोटी भरकटल्या असून 32 खलाशी हरवल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही बोटींवर मिळून बारा खलाशी होते. नावा शिवा येथील दोन बोटी वादळात भरकटल्या असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली.
कुलाबा मुंबई येथील यशोदा कृष्णा आणि वसई येथील वेलंकनी आई या मच्छीमार बोटी समुद्रात बुडत असताना त्यांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळत आहे.
