नवले ब्रिज जवळ पुन्हा अपघात! पाच गाड्यांना ट्रकने दिली जोरदार धडक

नवले ब्रिज जवळ पुन्हा अपघात! पाच गाड्यांना ट्रकने दिली जोरदार धडक

ट्रकच्या धडकेत चार ते पाच गाड्यांचा अपघात; एका कारला ट्रकने दीड किलोमीटर नेले फरपटत
Published on

चंद्रशेखर भांगे | पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळील भूमकर पुल येथे एका कंटेनरने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. हा अपघात सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडला.

नवले ब्रिज जवळ पुन्हा अपघात! पाच गाड्यांना ट्रकने दिली जोरदार धडक
महायुतीत पडणार मिठाचा खडा? अजित पवारांच्या 'त्या' जागेवर दावा, केसरकरांची सूचक प्रतिक्रिया

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील भूमकर पुलावर एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोर असलेल्या एका पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर शिवशाही बस, एक ट्रक, दोन कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यातील पिकअप वाहनाची पाठीमागील छत संपूर्ण निघून गेले आहे. तर दोन कारचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. या धडकेत डस्ट घेऊन निघालेला ट्रक महामार्गावर पलटी झाला.

या अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन व पोलीस अंमलदार तसेच भारती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, सिंहगड वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. यावेळी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com