भुसावळ रेल्वे विभागात प्रवास करणाऱ्या एकूण 69 हजार प्रवाशांकडून पाच कोटींचा दंड वसूल
भुसावळ रेल्वे विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात भुसावळ रेल्वे विभागातील वाणिज्य विभागाने धडक मोहीम राबवत या मोहिमेअंतर्गत एका महिन्यात 69 हजार 200 विनातिकीट प्रवास करणाऱ्या , यासह विना मास्क प्रवास करणाऱ्या व रेल्वे परिसरात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली असून या कार्यवाहीत 5 कोटींचा दंड वसूल रेल्वे प्रशासनाने वसूल केला आहे.
मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या दहा महिन्यांत ३१ लाख १० हजार केसेस दाखल करीत तब्बल १८६ कोटी ५३ लाखांचा दंड वसूल केला आहे. देशातील सर्व रेल्वे झोनमध्ये मध्य रेल्वेने वसुल केलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.
मध्य रेल्वे विनातिकीट प्रवाशांविरोधात सातत्याने मोहीम राबवित असते. मध्य रेल्वेने एकट्या फेब्रुवारी २०२२ या महिन्यात विनातिकीट व बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांविरोधात तीन लाख ४१ हजार केसेस दाखल केल्या असून २० कोटी ८८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या मोहिमेत ५२,७६५ जणांवर कोविड नियम तसेच मास्क परिधान न केल्याप्रकरणी ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने अधिकृतपणे तिकीट काढून सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.
या कार्यवाही साठी रेल्वे वाणिज्य विभागातर्फे स्वतंत्र पथके तयार करण्यात आले होते, या पथकांच्या माध्यमातून ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती भुसावळ रेल्वे विभागाने दिली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन काढलेले तिकीट अनिवार्य नसल्याने प्रवाशांच्या तिकीटाची रक्कम भरून प्रवास करता येणार आहे. अशा प्रकारच्या कारवाईत प्रवाशांकडून दंड घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे.