PM Narendra Modi : Independence Day 2025 : आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
(PM Narendra Modi) आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केले. यंदा स्वातंत्र्य दिनाची थीम ‘नवा भारत’ ठेवण्यात आली आहे, ज्याचा उद्देश 2047 पर्यंत भारताला समृद्ध, सुरक्षित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवणे आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातून 5000 हून अधिक विशेष पाहुण्यांना निमंत्रित केले होते. यामध्ये स्पेशल ऑलिंपिक्स 2025 चे खेळाडू, शेतकरी, युवा लेखक, स्वच्छता कर्मचारी आणि 85 सरपंचांचा समावेश आहे. यंदा राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग असून, ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील यशाचेही गौरव सोहळ्यात करण्यात आले.
लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर 21 तोफांची सलामी दिली गेली. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारे संदेश दिले गेले आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी केलेले योगदान अधोरेखित केले गेले.
या उत्सवामुळे संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिनाची भावना अधिक उंचावली असून, विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आणि नागरिकांसाठी विशेष सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्याद्वारे देशातील युवक, शेतकरी आणि नागरिकांना प्रेरणा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.