Kalyan Road Traffic: कल्याण स्टेशन परिसरात उड्डाणपुलाचं काम सुरू;  वाहतुकीत होणार 'असा' मोठा बदल

Kalyan Road Traffic: कल्याण स्टेशन परिसरात उड्डाणपुलाचं काम सुरू; वाहतुकीत होणार 'असा' मोठा बदल

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मध्य रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत गर्डर टाकले जाणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत मध्य रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी स्मार्ट सिटीसह वाहतूक पोलीस सज्ज झाले असून कामाच्या ठिकाणी कामामध्ये अडथळा निर्माण हाऊ नये, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुढील दहा दिवस बदल करण्यात आले आहेत.

Kalyan Road Traffic: कल्याण स्टेशन परिसरात उड्डाणपुलाचं काम सुरू;  वाहतुकीत होणार 'असा' मोठा बदल
Marathi Pati Mumbai : मराठी पाट्यांच्या नियमाला दुकानदारांकडून हरताळ

कल्याण वल्ली पीर चौका कडून कल्याण रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील. भानू सागर टॉकीज कडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छित स्थळी जातील.

कल्याण रेल्वे स्टेशन कडून वल्लीपूर चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल व अर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला. साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावीकडून वळण घेऊन गुरुदेव हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील. भानू सागर टॉकीज कडे जाणारी वाहने साधना हॉटेल अर्चिस गॅलरी येथून डावीकडील बाजूने वळून गुरुदेव हॉटेल चौक बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छितस्थळी जातील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com