बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे तिघं वन विभागाच्या ताब्यात

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे तिघं वन विभागाच्या ताब्यात

Published by :
Published on

निसार शेख, प्रतिनिधी
वन्य प्राण्यांची तस्करी करणे यांसारख्या गोष्टी आज काल सर्रस झालेल्या पाहायला मिळतात. अशातच मुंबई गोवा महामार्गावर बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोदवली, राजापूर येथील एका पेट्रोल पंपावरून तीन संशयित दुचाकी स्वारांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगेमध्ये बिबट्या वन्य प्राण्याची कातडी आढळून आल्याने वन्य प्राण्याच्या तस्करी बाबत आरोपी यांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

जयेश बाबी परब, रा. शिरोडा,ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग वय -२३ वर्षे, दर्शन दयानंद गडेकर रा. शिरोडा,ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग वय – २०वर्षे, दत्तप्रसाद राजेंद्र नाईक रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग वय – २२ वर्षे अशी तीन संशयितांची नावे आहेत. आरोपीकडून बिबट्या या प्राण्याची कातडी जप्त करुन घेतली आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com