Mahayuti : महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला? 'या' ठिकाणी एकत्र लढणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahayuti ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाल्या असून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याचे बोलले जात असून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार असल्याची माहिती मिळत आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीची वेगळी रणनीती पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेबाबत भाजप व शिवसेनेचे अजूनही ठरत नसल्याची माहिती मिळत आहे.
Summery
महायुतीचा महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र लढणार
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार
